Saturday, February 28, 2026

कॉपीची गोष्ट .....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------------
कॉपीची गोष्ट
ज्याला त्याला सामील करून घ्या,
ही गोष्ट सगळ्यांसाठी खूप सोपी आहे.
एकीचे बळ मिळते फळ....
तिचेच नाव तर परीक्षेतील कॉपी आहे.
घरचे दारचे सगळे सामील,
त्यामुळे कॉपीची लाज वाटत नाही !
बचेंगे तो और भी लढेंगे मुळेच,
अभ्यासाची गरज आज वाटत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 95
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
28 फेब्रुवारी 2026

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...