Saturday, February 21, 2026

राजकीय गरज.....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------------
राजकीय गरज
राजकारण करू नका म्हणणारेच,
स्वतःच राजकारण करू लागतात.
मुद्दा कोणताही असला तरी,
राजकारणाची कास धरू लागतात.
एक मात्र नक्की आहे,
जेवढी त्यांना राजकारणाची चटक आहे !
त्याहून कितीतरी पट जास्त,
राजकारण हा एक प्रमुख घटक आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 91
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
21 फेब्रुवारी 2026

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...