आजची वात्रटिका
----------------------------
आत्मघात
आपल्या स्वतःच्या जाळ्यात,
जे ते जास्तच जखडू लागले आहेत.
संकुचित मनाचे लोक,
जरा जास्तच आखडू लागले आहेत.
फक्त एकाच बाजूने नाही तर,
सगळीकडूनच हा प्रकार घडतो आहे.
क्रियेनंतरची प्रतिक्रिया म्हणून,
आखडूपणाही जास्तच वाढतो आहे.
नको तिथे हात पसरलेला,
पाहिजे तिथे आखडलेला हात आहे !
हा तर समाजाकडून समाजाचा,
अगदी उघड उघड आत्मघात आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9194
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
19 फेब्रुवारी 2026

No comments:
Post a Comment