Tuesday, February 10, 2026

मुक्काम पोस्ट सोशल मीडिया ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
मुक्काम पोस्ट
सोशल मीडिया
लोकांच्या उत्सुकतेची आणि वेडेपणाची,
सोशल मीडियाने दखल घेतली आहे.
जणू माकडाच्या हाती कोलित यावे,
तशी भर त्यात ए.आय.ने घातली आहे.
ओत पाणी;कर कालच्यावाणी,
टुकारांचा टुकार रतीब पुन्हा आहे.
जणू सोशल मीडिया हाताळणे,
हल्ली तमाम नेटकऱ्यांसाठी गुन्हा आहे.
तथाकथित सोशल मीडिया स्टारचा,
जेवढा नंगानाच,तेवढाच धुमाकूळ आहे !
कसेही कमवा, पैसे कमवा,
हेच त्यांच्या नंगानाचाचे खरे मूळ आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9186
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
10 फेब्रुवारी 2026

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...