आजची वात्रटिका
----------------------------
काळजीस कारण की
कुठे कुठे दारूचा घमघमाट,
कुठे कुठे अश्लील डान्स आहे.
जयंती पुण्यतिथी म्हणजे,
संधीसाधूंसाठी आयता चान्स आहे.
ज्यांना ज्यांना साधायची आहे,
त्यांच्याकडून संधी साधली जाते.
एकदा राजकारण रंगले की,
जयंती पुण्यतिथी बाधली असते.
याचा अर्थ मुळीच असा नाही,
जल्लोष आणि थाटमाट नको आहे !
नाचू गाऊ;विचारमय होऊ,
फक्त संधीसाधूंचा नाट नको आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9195
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
20 फेब्रुवारी 2026

No comments:
Post a Comment