Wednesday, February 11, 2026

धक्का तंत्र .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
धक्का तंत्र
असंगाशीच संग आहे,
जो तो सत्तेसाठी दंग आहे.
आजचे राजकारण म्हणजे,
बीभत्स राजकीय व्यंग आहे.
परस्परांची टवाळी आहे,
लोकशाहीची टिंगल आहे.
अत्यंत हास्यास्पद अशी,
राजकारणाची दंगल आहे.
विरोधाभासाचे धक्के तर,
सगळीकडूनच बसत आहेत !
याचा उलगडा न केलेला बरा,
कोण कुणावर हसत आहेत?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9187
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
11 फेब्रुवारी 2026

 

No comments:

धक्का तंत्र .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- धक्का तंत्र असंगाशीच संग आहे, जो तो सत्तेसाठी दंग आहे. आजचे राजकारण म्हणजे, बीभत्स राजकीय व्यंग आहे. ...