आजची वात्रटिका
-----------------------
निष्ठा प्रदर्शन
वाढदिवसापासून दिवसापर्यंत,
निष्ठादर्शनाचा कार्यक्रम केला जातो.
कार्यक्रम कोणताही असला तरी,
त्याला राजकीय रंग दिला जातो.
सगळा प्रकार किळसवाणा तरीही,
आपली हौस भागवून घेतली जाते.
त्यांचे त्यांनाच कळत नाही,
कुणाची कुणाकडून घातली जाते?
ज्याच्या त्याच्या निष्ठादर्शनाचे
चक्क निष्ठा प्रदर्शन होऊन जाते !
प्रदर्शनाचे कितीही हसू झाले तरी,
त्यांना असुरी समाधान देऊन जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9185
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
9 फेब्रुवारी 2026

No comments:
Post a Comment