Sunday, February 8, 2026

सबुरीचा सल्ला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
सबुरीचा सल्ला
ठो ठो ठोकायला लागले,
भो भो भोकायला लागले.
मनामधली सगळी गरळ,
ओक ओक ओकायला लागले.
ओकून झाले,ठोकून झाले,
जसे वाटेल तसे भोकून झाले.
घोकून घोकून तेच सांगतात,
झाले ते सारे चुकून झाले.
त्यांचे त्यांनाच कळत नाही,
हा इज्जतीचा तमाशा आहे !
दूध पोळले त्यांनी ताक फुंकावे ,
किमान एवढी तरी आशा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9184
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
8फेब्रुवारी 2026
 

No comments:

कातडी बचाव .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- कातडी बचाव वादग्रस्त घटनांकडेसुद्धा, जो तो आपल्या सोयीने पाहतो आहे, ज्याचा त्याचा घोडा सुद्धा, व...