Thursday, February 19, 2026

पॉवर प्ले.....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------------
पॉवर प्ले
तिला त्याच्या खेळण्याचा,
वेळोवेळी डाऊट येतो.
पॉवर प्ले संपायच्या आत,
जेव्हा जेव्हा तो आउट होतो.
आपल्या धडाकेबाज खेळापुढे,
तो तिला गृहीत धरत नाही !
ओव्हर शिल्लक राहिल्यावर,
रन रेट महत्त्वाचा ठरत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 89
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
19 फेब्रुवारी 2026

 

No comments:

कातडी बचाव .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- कातडी बचाव वादग्रस्त घटनांकडेसुद्धा, जो तो आपल्या सोयीने पाहतो आहे, ज्याचा त्याचा घोडा सुद्धा, व...