Saturday, February 28, 2026

भाषा समृद्धी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
भाषा समृद्धी
कधीतरी कंबरेच्या वर,
जास्त वेळा कंबरेच्या खाली जाते.
सर्वच राजकारण्यांकडून,
मराठी भाषा समृद्ध केली जाते.
राजकीय आरोप प्रत्यारोपात,
माय मराठीचा प्रचार केला जातो.
सर्व प्राणीमात्रांचा उद्धार कसा होईल?
याचाही सतत विचार केला जातो.
मराठी भाषा समृद्धीत,
सर्वपक्षीयांचा सढळ हात आहे !
राजकारणी लोकांमुळे खात्री पटते,
मराठी खरोखरच अभिजात आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9203
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
28 फेब्रुवारी 2026

No comments:

daily vatratika.. 24Sept2026