साप्ताहिक
वात्रटिका
--------------------------------
एप्स्टिनची दुनिया
एप्स्टिन फाईलचे नाव ऐकताच,
भल्या भल्यांच्या पोटात खड्डा आहे.
जगातल्या प्रत्येकाला वाटू लागले,
आपल्या भोवती एप्स्टिनचा अड्डा आहे.
एप्स्टिन फाईलच्या भुतापासून,
प्रत्येक जण स्वतःला वाचवतो आहे.
एप्स्टिन फाईलचे भांडवल करून,
इथे जो तो एकमेकांना नाचवतो आहे.
त्याने त्याने सोडला सुटकेचा नि:श्वास,
ज्याचे नाव फाईल पासून दूर आहे !
एप्स्टिन फाईलने सिद्ध केले,
हे जग किती राक्षसी आणि क्रूर आहे?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा
वात्रटिका - 73
वर्ष- दुसरे
14फेब्रुवारी 2026
No comments:
Post a Comment