Tuesday, February 3, 2026

गिधाडांचे मनोगत....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका 
-------------------------------

गिधाडांचे मनोगत

इकडून घिरट्यावर घिरट्या आहेत,
तिकडून लचक्यावर लचके आहेत. 
तरीही गिधाडे फडफडत म्हणाले, 
तुमचे टीकात्मक शब्द कुचके आहेत. 

एकदा शिकारीचा अंदाज आला की, 
आम्हाला तर असेच वागले पाहिजे !
निंदकाचे घर शेजारी असले तरी,
आम्ही स्वभावाला जागले पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 82
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
3 फेब्रुवारी 2026
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...