Saturday, February 21, 2026

चौकशीचा किडा..... साप्ताहिक वात्रटिका


साप्ताहिक
वात्रटिका 
--------------------------------

चौकशीचा किडा

कुठल्याही चौकशीचा किडा, 
आपल्या प्रत्येकालाच छळू शकतो.
कुठे जळल्या जातात फाईल, 
कुठे ब्लॅक बॉक्सही जळू शकतो. 

कुणी रंगेहात पकडले की, 
हात साफ करून घेतले जातात. 
जिथे जिथे धुऊन घेता येतील,
तिथे तिथे हात धुतले जातात.

चौकशी आणि अहवालांचा, 
त्यामुळेच प्रत्येकाला विट आहे !
नको त्यांच्या हातामध्ये बेड्या,
नको त्याच्या हाती क्लीन चीट आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा 
वात्रटिका - 75
वर्ष- दुसरे 
21फेब्रुवारी 2026


No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...