Monday, February 2, 2026

घराणेशाहीचे समर्थन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
घराणेशाहीचे समर्थन
पक्षीय कार्यकर्त्यांबरोबर नेतेही,
निष्ठादर्शनाची संधी हेरू लागतात.
लोकशाहीचे समर्थन करतानाच,
घराणेशाहीचा आग्रह धरू लागतात.
घराणेशाहीच्या समर्थनाचा खेळ,
उघड्या डोळ्यांनी पाहिला जातो.
प्रत्यक्ष काळही समर्थक म्हणून,
त्यांच्याच बाजूने उभा राहिला जातो.
सहानुभूतीची त्सुनामी लाटेमुळे,
सगळे पाणी पुलाखालून वाहून जाते !
मागे काळाचे समर्थन असले की,
घराणेशाहीही सर्टिफाइड होऊन जाते !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9178
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
2 फेब्रुवारी 2026

 

No comments:

अपघाती सत्य .....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- अपघाती सत्य ज्योतिषांनी हाणल्या ढगात गोळ्या, नेमके तेव्हाच विमान कोसळले गेले. योगायोगाने ज्योतिष...