Thursday, February 12, 2026

कॉपी म्हणाली कॉपीला.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
कॉपी म्हणाली कॉपीला
कॉपी पेस्ट, सगळ्यात बेस्ट,
आपलीच आपल्याला लाज वाटू लागली.
कर्ता आणि करविता भितो कुणाला?
त्यांची डेरिंग बघून आपलीच फाटू लागली.
जे पेरले तेच उगवत आहे,
सांग याच्यामध्ये दोषी कोण आहेत?
सीसीटीव्हीचे तर फुटले डोळे,
चक्रावलेले भिरभिरते ड्रोन आहेत.
कुणाचे निलंबन, कुणाची बडतर्फी,
कुणावर कसली कसली आफत आहे !
जी निव्वळ पोपटपंची बनली,
ती शाळेतली कॉपीमुक्तीची शपथ आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9188
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
12 फेब्रुवारी 2026
----------------------------

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...