Thursday, February 12, 2026

कॉपी मुक्तीचा फज्जा...... आजची वात्रटिका


आजची वात्रटिका 
-----------------------------

कॉपी मुक्तीचा फज्जा

परीक्षा कोणतीही असली तरी, 
परीक्षा म्हणजे निव्वळ मज्जा आहे. 
कॉपीमुक्त अभियानाचा, 
प्रत्येक परीक्षे परीक्षेत फज्जा आहे.

भरारी आणि बैठ्या पथकाचे,
ड्रोन एवढेच कॉपी वर लक्ष आहे !
कॉपीमुक्तीच्या फज्जाला,
उंदराबरोबर मांजराची साक्ष आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 84
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
12 फेब्रुवारी 2026

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...