Monday, February 2, 2026

अपघाती सत्य .....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
अपघाती सत्य
ज्योतिषांनी हाणल्या ढगात गोळ्या,
नेमके तेव्हाच विमान कोसळले गेले.
योगायोगाने ज्योतिषांचे भाव,
अचानकपणे गगनाला उसळले गेले.
हातभर इकडे;हातभर तिकडे,
ज्योतिषांच्या अंदाजाचे फलित आहे !
अपघातांच्या दुर्घटना म्हणजे,
जणू माकडांच्या हाती कोलीत आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 81
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
2 फेब्रुवारी 2026

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...