आजची वात्रटिका
----------------------------
भाषिक समन्वय
कोणत्याही भाषेचे राजकारण नको,
संवर्धन आणि विकास झाला पाहिजे.
ज्याची त्याची मातृभाषा म्हणजे,
ज्याचा त्याचा श्वास झाला पाहिजे.
कोणत्याही भाषिकांकडून,
कोणत्याही भाषिकाचा द्वेष नको.
आपल्या भाषिक बेजाबाबदारपणाचा,
कोणत्याही भाषिकावर दोष नको.
जशी मातृभाषा जगली पाहिजे,
तशा इतरही भाषा जगल्या पाहिजेत !
भाषा भाषा म्हणजे सवती नाहीत,
त्या बहिणीप्रमाणे वागल्या पाहिजेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9202
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
27 फेब्रुवारी 2026

No comments:
Post a Comment