Friday, February 6, 2026

उंचे लोग उंची पसंद...आजची वात्रटिका

 

आजची वात्रटिका
----------------------------
उंचे लोग उंची पसंद
तुम्हालाही वाटू शकते,
आपल्याला भाव आहे की नाही?
एप्स्टिन फाईल मध्ये
आपलेही नाव आहे की नाही?
ज्यांचे ज्यांचे आले आहे,
त्यांची अवस्था बघा काय आहे?
उंचे लोग उंची पसंद,
त्यांची दे माय धरणी ठाय आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
आजची वात्रटिका - 83
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
6 फेब्रुवारी 2026

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...