आजची वात्रटिका
-----------------------
हवा आणि दावा
इकडूनही डाव टाकले गेले,
तिकडूनही डाव टाकले गेले.
प्रफुल्लित झालेले चेहरे,
अचानकपणे सुकले गेले.
हे कुणाला पटेल असे नाही,
हे कुणा कुणाला पटू शकते.
कुणी गट करे, कुणी तट करे,
आपलेच म्हणणे पुढे रेटू शकते.
विलीनीकरणाच्या चर्चेची,
अगदीच उलट सुलट हवा आहे !
विलीनीकरणाच्या चर्चेवरती,
परस्पर विरोधी दावा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9180
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
4 फेब्रुवारी 2026

No comments:
Post a Comment