Monday, February 23, 2026

सदिच्छा भेट....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------------
सदिच्छा भेट
काल जे एकमेकांना खेटले,
आज तेच एकमेकांना भेटत आहेत.
कितीही स्पष्टीकरण दिले तरी,
नव्या नव्या वावड्या उठत आहेत.
उठलेल्या वावड्यांनासुद्धा,
त्यांच्याकडून नकळत हवा आहे !
राजकीय इच्छा लपल्या नाहीत तरी,
त्यांचा सदिच्छा भेटींचा दावा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 92
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
23 फेब्रुवारी 2026

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...