Saturday, February 14, 2026

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने.......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने
प्रत्येक प्रेमवेडी आणि प्रेमवेडा,
व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईन बोलत असतो.
दरवर्षी येणारा व्हॅलेंटाईन डे,
अनेक कवींना जन्माला घालत असतो.
या दिवशी जसे कवी जन्माला येतात,
तशा कवयित्रीही जन्माला येत असतात.
यात त्यांचा भरणा जास्त असतो,
जे फसविलेले किंवा स्वतः यात फसतात.
सफल आणि विफल प्रेमाचेही,
जणू व्हॅलेंटाईन डे प्रतीक बनला आहे !
खरे खोटे मात्र त्याला विचारा,
ज्याने खऱ्या प्रेमाचा अर्थ जाणला आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9189
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
14 फेब्रुवारी 2026
 

No comments:

घुसखोरी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- घुसखोरी खोटे खोटे बोलत रहा, खरे बोलायचीही चोरी आहे. हल्ली जिकडे बघावे तिकडे, घुसखोरी एके घुसखोरी...