Tuesday, February 3, 2026

नस्ती उठाठेव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
नस्ती उठाठेव
आम्ही काही बघितले नाही,
आम्ही तर फक्त वाचले आहे.
त्याचा एवढा गाजावाजा कशाला?
कुणीतरी कुठेतरी नाचले आहे.
ज्याचा त्याचा वेगळा अंदाज आहे,
ज्याची त्याची वेगळे स्टाईल आहे.
जिकडे बघावे तिकडे चर्चेत,
फक्त फाईल आणि फाईल आहे.
इतिहासाचा मागवा घेतला तर,
फाईल वरून काहीही घडू शकते !
भविष्यात फाइल्स नावाच्या,
चित्रपटाची नवी भर पडू शकते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9179
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
3 फेब्रुवारी 2026

No comments:

नस्ती उठाठेव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- नस्ती उठाठेव आम्ही काही बघितले नाही, आम्ही तर फक्त वाचले आहे. त्याचा एवढा गाजावाजा कशाला? कुणीतरी कुठ...