Friday, February 27, 2026

दूरदर्शन वृत्तांत.... आजची वात्रटिका



आजची वात्रटिका
-----------------------------

दूरदर्शन वृत्तांत

जशी आपापल्या बोली भाषेत, 
आपली माय मराठी बोलली जाते.
तशी मराठी दूरदर्शन वाहिन्यांकडून,
आपली माय मराठी सोलली जाते.

जेवढी नडते घाई गडबड, 
तेवढाच संपादनाचाही अभाव आहे !
मराठी दूरदर्शन वृत्तवाहिन्यांचा, 
इतरांवरतीही मनोरंजक प्रभाव आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 94
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
27 फेब्रुवारी 2026

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...