Thursday, February 26, 2026

पक्षीय नातेगोते.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
पक्षीय नातेगोते
कुणी पक्षामध्ये येते आहे,
कुणी पक्षातून जाते आहे.
जाणारांचे आणि येणाऱ्यांचे,
परस्परांशी पक्षीय नाते आहे.
गोत्यामुळे नात्यात आहे,
कुणी नात्यामुळे गोत्यात आहे,
कुणी सुपामध्ये असला तरी,
कुणी कुणी मात्र जात्यात आहे.
कुणाच्या जाण्याचे बाऊ आहेत,
कुणाचा येण्याचेही बाऊ आहेत !
जसे कुणी सख्खे; कुणी सावत्र,
तसे कुणी जुळे भाऊ आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9201
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
26 फेब्रुवारी 2026

 

No comments:

daily vatratika.. 24Sept2026