Tuesday, February 17, 2026

ऐतिहासिक चिवडाचिवड....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

ऐतिहासिक चिवडाचिवड
गरजेनुसार आणि सोयीनुसार,
कोणताही इतिहास निवडला जातो.
जो जो आपल्या फायदेशीर,
नेमका तोच इतिहास आवडला जातो.
इतिहास आवडी निवडीसाठी नसतो,
इतिहास कुणाच्या सवडीसाठी नसतो!
इतिहासाचे खंडन करा; मंडन करा,
इतिहास चिवडा-चिवडीसाठी नसतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 87
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
17 फेब्रुवारी 2026

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...