Saturday, February 28, 2026

सच्चाईची कहाणी.... साप्ताहिक वात्रटिका


साप्ताहिक
वात्रटिका 
--------------------------------

सच्चाईची कहाणी 

कुणी नको तेवढे लुच्चे आहेत, 
कुणी कुणाचे बगलबच्चे आहेत.
नको तेवढी लबाडांची भरती, 
बोटावर मोजण्याएवढे सच्चे आहेत. 

जे जे कुणी सच्चे आहेत, 
त्यांच्याभोवती लुच्च्यांचा वेढा आहे.
ज्यांनी घेतले वेड्याचे सोंग, 
त्यांच्या त्यांच्या हाती मात्र पेढा आहे.

इथे लुच्चांचेच झाले बहुमत, 
सच्चे मात्र बिचारे अल्पमतात आहेत !
ज्या  सच्चांना होऊ लागले पश्चाताप,
तेही पार्टी बदलण्याच्या बेतात आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा 
वात्रटिका - 76
वर्ष- दुसरे 
28फेब्रुवारी 2026

No comments:

daily vatratika.. 24Sept2026