आजची वात्रटिका
-----------------------
उलटा न्याय
मोठ्याचे सगळेच मोठे असते,
छोट्याचे सगळेच छोटे असते.
मोठ्याचे खोटेही खरे तर,
छोट्याचे खरेही खोटे असते.
मोठ्यांचे आणि छोट्यांचे,
दुहेरी असे मापदंड असतात.
मोठ्यांची बरोबरी करण्याचे,
छोट्यांनाही भारी कंड असतात.
मोठे कितीही चुकीचे असोत ,
मोठेच बरोबर धरले जातात !
तोंड दाबून बुक्क्यांचा मार,
छोट्यांचे कंड जिरले जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9177
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
1 फेब्रुवारी 2026
