Showing posts with label भावी पंतप्रधान. Show all posts
Showing posts with label भावी पंतप्रधान. Show all posts

Friday, July 16, 2021

अढळपद

आजची वात्रटिका
--------------------

अढळपद

भविष्यातील वाटचालीचा,
एक प्रश्न इतिहास जमा झाला.
भावी राष्ट्रपती पदाचा,
त्यांनी एकदाचा राजीनामा दिला.

आज हातात हात घेउन,
ताणलेले धनुष्यबाण आहेत!
भावी पंतप्रधान पदावर,
अजून तरी ते विराजमान आहेत!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6207
दैनिक पुण्यनगरी
16जुलै2021
 

Sunday, May 26, 2019

पंचवार्षिक मुदतवाढ



आ।ज।ची।वा।त्र।टि।का
--------------------------------
पंचवार्षिक मुदतवाढ
दिल्लीचे स्वप्न भंगले,
जे ते आपल्या गावीच राहिले.
सगळे भावी पंतप्रधान,
अखेर भावी ते भावीच राहिले.
आपण पंतप्रधान होणारच,
त्यांचा विश्वास तसा गाढ आहे !
त्यांच्या 'भावी पंतप्रधान'पदाला,
आता पंचवार्षिक मुदतवाढ आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6958
दैनिक झुंजार नेता
26मे2019
------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्व वाचक,प्रेक्षक, अभिप्रायदार,शेअरकर्ते,सहमतीदार, असहमतीदार,अंशतः सहमतीदार आणि निव्वळ बघे या सर्वांचे पुन्हा एकदा आभार
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...