Friday, May 1, 2026

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
महाराष्ट्र माझा
भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला,
सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा.
आपल्या स्वतःचीच फसवणूक,
आज बघतोय महाराष्ट्र माझा.
फसले गेले,फसतच आहेत,
कुठे नेऊन ठेवलाय आपला भेजा?
मजबूर लोकांचा बिनडोकपणा,
आज बघतोय महाराष्ट्र माझा.
उज्वल वारशाचा आरसा व्हावा,
कशाला भोंदूत्वाची पूजा ?
वाईटातूनही चांगले घडण्याची आशा,
आज बघतोय महाराष्ट्र माझा !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
9264
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
1 मे 2026

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...