आजची वात्रटिका
--------------------------
आशा आणि निराशा
ज्याला ज्याला लागली आशा,
त्याच्या पदरी निराशा येऊ शकते.
सत्तेच्या राजकारणात,
हे तर पुन्हा पुन्हा होऊ शकते.
निराशेला लागून निराशा येते,
तेव्हा खरी पंचायत होऊन जाते.
कोणत्याही सच्चा कार्यकर्त्याला,
निराशा मोठा चटका देऊन जाते.
जे कार्यकर्ते कच्चे बच्चे असतात,
त्यांना निराशेची कधीच खंत नाही!
ज्यांच्या पदरी आली निराशा,
त्यांच्याही आशेला कधीच अंत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9263
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
30 एप्रिल 2026

No comments:
Post a Comment