Tuesday, April 28, 2026

भावी नेतृत्व दर्शन ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
भावी नेतृत्व दर्शन
लोकशाहीला त्यावर धक्के,
तेव्हा तर बसायला लागतात.
जेव्हा फक्त नेत्यांच्या पोरातच,
भावी नेते दिसायला लागतात.
हे नेतृत्व दर्शन आपल्याला नाही,
फक्त कार्यकर्त्यांना होऊ लागते.
आंधळ्या निष्ठा दर्शनात,
लोकशाहीही माती खाऊ लागते.
नेत्यांच्या पोरात दिसतो नेता,
आपल्या पोरात कार्यकर्ता दिसतो !
आपल्या मानसिक गुलामगिरीचा,
कार्यकर्ताच कर्ता धर्ता असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9261
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
28 एप्रिल 2026

 

No comments:

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...