Monday, April 13, 2026

वैचारिक गद्दारी ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
वैचारिक गद्दारी
महापुरुषांच्या विचारांचे मारेकरी,
वारसदार म्हणून मिरवू लागले.
महापुरुषांच्या आदर्शांचे धडे सोडून,
भलते सलते धडे गिरवू लागले.
महापुरुषांच्या आदर्शला,
हा तर सरळ सरळ तडा आहे.
महापुरुषांच्या नावावरती,
जिकडे पहावे तिकडे राडा आहे.
महापुरुषांचे लक्ष्य एक होते,
वैचारिक गद्दारांचे वेगळेच लक्ष्य आहे !
वैचारिक गद्दारांच्या नंगा नाचाला,
पुन्हा महापुरुषांची साक्ष आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9246
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
13 एप्रिल 2026

 

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...