Friday, April 3, 2026

सुनेत्रांजन.....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

सुनेत्रांजन

एकदा घर फिरल्यावर,
घराचे वासे फिरू लागले.
घड्याळातले काटेही बघा,
नेमके कसे फिरू लागले?

कुणाला पटेल ना पटेल,
कुणी पायउतार केले आहेत !
कालचे प्रफुल्ल चेहरे,
पार ओशाळून गेले आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 119
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
3 एप्रिल 2026

 

No comments:

नामांतराची टूम....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- नामांतराची टूम कुठे नामविस्ताराचा तोडगा, कुठे नामांतराचे खुसपट आहे. ज्याचे दिले गेले नाव, त्याची हकनाक घ...