आजची वात्रटिका
----------------------------
दर्शन
जसे कुणी योगी आहेत,
तसे कोणी भोगी आहेत.
काहीकडे पाहिल्यावर वाटते,
हे तर मानसिक रोगी आहेत.
जसे कुणी गांजाफुके,
तसे कुणी अघोरी आहेत.
अशाच विकृतांच्या पायावर,
भक्तांच्या लगोरी आहेत.
दर्शनाचे होतात सोहळे,
तरीही भक्तांना सत्य दिसत नाही !
याच्यापेक्षा दुसरा कोणताच,
भक्तांचा अंधपणा असत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9245
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
12 एप्रिल 2026

No comments:
Post a Comment