Wednesday, April 15, 2026

डीजेयुक्त जयंती ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
डीजेयुक्त जयंती
डीजे शिवाय कोणतीही जयंती,
कार्यकर्त्यांना जयंतीच वाटत नाही.
डीजे शिवाय कोणतीही जयंती,
कार्यकर्त्यांच्या मनाला पटत नाही.
डीजे मुक्त जयंतीच्या विचार,
कार्यकर्त्यांच्या मनाला मानवत नाही.
डीजे शिवाय जयंती थरार,
कार्यकर्त्यांच्या मनाला जाणवत नाही.
डीजे सलामत तो जयंत्या पचास,
असेच कार्यकर्त्यांचे धोरण आहे !
सामाजिक शांतता आणि स्वास्थ्य,
डीजेच्या आवाजापुढे तारण आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-9248
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
15 एप्रिल 2026

 

No comments:

नामांतराची टूम....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- नामांतराची टूम कुठे नामविस्ताराचा तोडगा, कुठे नामांतराचे खुसपट आहे. ज्याचे दिले गेले नाव, त्याची हकनाक घ...