Sunday, November 15, 2026

पक्षांतर शास्त्र... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------------

पक्षांतर शास्त्र

निवडणूकांच्या मोसमात,
पक्षांतराची साथ असते. 
एकमेकांच्या फोडाफोडीने,
परस्परांवर मात असते.

पक्षांमध्ये कुजण्यापेक्षा,
पक्षांतराचा मार्ग शोधला जातो! 
आवक-जावक जुळली की,
पक्षीय समतोल साधला जातो!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-4261
दै.झुंजार नेता
15 नोव्हेंबर 2011

No comments:

पक्षांतर शास्त्र... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- पक्षांतर शास्त्र निवडणूकांच्या मोसमात, पक्षांतराची साथ असते.  एकमेकांच्या फोडाफोडीने, ...