आजची वात्रटिका
--------------------
पक्षीय फटाकडे
कुणी वातीचे,कुणी बिनवातीचे,
सर्व गोष्टी कळून चुकल्या आहेत.
पक्ष पक्षातले कार्यकर्ते म्हणजे,
दिवाळीतल्या टिकल्या आहेत.
प्रवक्ते नावाच्या नागगोळीचा,
एकत्रच जाळ आणि धूर असतो.
लवंगी फटाकड्यांच्या विरोधात,
सर्वच सुरसुऱ्यांचा सूर असतो.
उठता बसता आपटी खाल्लेले,
आपटबार म्हणून ओळखले जातात!
फुलबाजा नावाचे चमकेश कार्यकर्ते,
धडाडीचे म्हणून झळकले जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9454
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
10 नोव्हेंबर 2026
----------------------------
No comments:
Post a Comment