आजची वात्रटिका
--------------------
सूत्रांचा धागा दोरा
सूत्र बित्र काही नसते,
सूत्र फक्त नावाला असतो.
पिकवलेल्या बातमीला,
सूत्रांचा हवाला असतो.
सूत्रांचा हवाला दिला की,
कुणी पुरावा मागत नाही.
कितीही शोध घेतला तरी,
सूत्रांचा धागा दोरा लागत नाही.
बिन पगारी;फुल अधिकारी,
सूत्रांची भूमिका स्पष्ट आहे !
सूत्रांचा हवाला देऊन सांगतो,
सूत्र ही काल्पनिक गोष्ट आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 94450
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
6 नोव्हेंबर 2026
--------------------------
सूर्यकांती
11000 पेक्षा जास्त वात्रटिकांचा खजिना...
मराठी साहित्यातील अद्वितीय असा उपक्रम... वाचण्यासाठी आणि बघण्यासाठी पुढील
लिंक वर क्लिक करा
https://suryakantdolase.blogspot.com
No comments:
Post a Comment