Sunday, November 1, 2026

क्रांती आणि उत्क्रांती... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------

क्रांती आणि उत्क्रांती

आरोपावरती प्रति आरोप, 
टीकेवर प्रतिटीकेला जोर आहे.
आता तर त्यांच्या वेठीला,
चक्क डायनासोर आहे.

गाढवाची आणि माकडाची, 
नेहमीच बोलण्यावर छाप आहे.
राजकीय नेत्यांच्या वाचाळतेला,
बेतालपणाचा शाप आहे.

त्यांच्या उत्क्रांतीला क्रांतीची,
नव्याने शाब्दिक जोड आहे !
वाचाळतेला कुचाळतेची,
पारंपरिक अशी ओढ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9445
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता 
1 नोव्हेंबर 2026
----------------------------
अकरा हजारांपेक्षा जास्त मार्मिक, बेधडक,बिनधास्त आणि सडेतोड अशा लोकप्रिय वात्रटिकांचा आनंद घेण्यासाठी क्लिक करा.. https://suryakantdolase.blogspot.com/2026/10/blog-post_31.html

No comments:

क्रांती आणि उत्क्रांती... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- क्रांती आणि उत्क्रांती आरोपावरती प्रति आरोप,  टीकेवर प्रतिटीकेला जोर आहे. आता तर त्यांच्या व...