Tuesday, November 3, 2026

बोके आणि धोके... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका



आजची वात्रटिका
------------------------------

बोके आणि धोके 

आपसात भांडती जे,
ते मस्तावलेले बोके आहेत. 
लोण्याचे गोळे आपले, 
हेच खरे धोके आहेत. 

हे बोके एवढे इरसाल की, 
आपल्यालाच उलटे जाब आहेत !!
बोक्यांच्या भांडणात, 
बोक्यांचेच लाभ आहेत !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-4249
दै.झुंजार नेता
3 नोव्हेंबर 2011

No comments:

विकासाची तक्रार... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------ विकासाची तक्रार  विकास मनाला उद्योजकाला,  तुझे कसे झकास आहे.  तुझी वाढ होत राहिली,...