Monday, November 2, 2026

फेसबुकचे 'होम' पेज.. प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका



आजची वात्रटिका
----------------------

फेसबुकचे 'होम' पेज

नवरा आणि बायकोचे
फेसबुकवर खाते आहे.
विरहाचे गाणे
बिचारी बेडरूम गाते आहे.

चॅटींग, शेअरींग, पोस्टींगचे
रोज नवे रतीब लावत आहेत !
उगीच आपले हातचे सोडून
पळत्याच्या मागे धावत
आहेत !

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------
चिमटा-3223|दै.पुण्यनगरी
4 मार्च 2013

No comments:

लाईट आणि फोन. प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------------- लाईट आणि टेलिफोन फोन म्हणाला लाईटला, आपण दोघे बहिण भाऊ.  दोघे मिळून जनतेचा,  जमे...