आजची वात्रटिका
----------------------
कोरम पुर्तीची
गण गण
तो म्हणायचा,थांब कोरम पूर्ण होऊ दे,
तीही म्हणायची,थांब कोरम पूर्ण होऊ दे.
शेवटी दोघेही कंटाळून म्हणाले,
दोघात तिसरा कशाला ?चल जाऊ दे.
कोरम पुर्तीची गण गण,
दोघांच्या स्वातंत्र्यावर बेतली होती!!
तिसरा कुणी यायच्या आतच,
दोघांनीही बैठक उरकून घेतली होती !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष सहावे
अंक 89 वा
7 सप्टेंबर 2026
No comments:
Post a Comment