Friday, November 6, 2026

रिमिक्स.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

रिमिक्स 

रिमिक्सच्या लाटेतून, 
प्रचारही सुटला नाही. 
असा एकही पक्ष नाही, 
जो अजून फुटला नाही. 

यांच्यातला त्यांच्यात, 
त्यांच्यातला यांच्यात, 
पक्षी  'रिमिक्स ' जोरात आहे!
जुन्यात चाली वरती, 
नवे गाणे उरात आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
------------------------------
चिमटा
दैनिक पुण्यनगरी
14 एप्रिल 2004

No comments:

बाजार... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------------- बाजार जिकडे तिकडे बाबा, नको तेवढे पंथ झाले. राष्ट्रासाठी काहीच न करता कुणी रा...