आजची वात्रटिका
-------------------------
रिमिक्स
रिमिक्सच्या लाटेतून,
प्रचारही सुटला नाही.
असा एकही पक्ष नाही,
जो अजून फुटला नाही.
यांच्यातला त्यांच्यात,
त्यांच्यातला यांच्यात,
पक्षी 'रिमिक्स ' जोरात आहे!
जुन्यात चाली वरती,
नवे गाणे उरात आहे !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
चिमटा
दैनिक पुण्यनगरी
14 एप्रिल 2004