Tuesday, November 10, 2026

ऊसाचा भाव.. प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
------------------------------

ऊसाचा भाव 

ऊस गोड लागला म्हणून, 
तो मुळासकट खाऊ नये. 
शेतकरी संकटात सापडेल, 
एवढाही कमी भाव देऊ नये. 

तुटेल एवढे ताणणारे, 
ऊसाचे राजकारण नको !!
साखर सम्राट यांच्या फायद्यासाठी, 
शेतकऱ्यांचा जीव तारण नको !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-4256
दै.झुंजार नेता
10 नोव्हेंबर 2011

No comments:

नोटांचा संवाद... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका --------------------------- नोटांचा संवाद पाचशेची म्हणाली हजाराचीला, तुझी माझी आता रद्दी आहे. अर्थतज्ञाला नव्हती ...