आजची वात्रटिका
-----------------------
दिमागी नक्षलवाद
दिमागी नक्षलवादाची टिंगल,
घरोघरी उडवायला लागले.
दिमागी नक्षलवादी म्हणून,
नवरा आणि बायको,
एकमेकांना चिडवायला लागले.
जेवढा नवरा चिडखोर,
तेवढी चिडखोर बायको आहे !
नक्षलवादी गॅंग म्हणू लागली,
मम्मी आणि पप्पा सायको आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
दैनिक वात्रटिका
अंक 91 वा
वर्ष- सहावे
9 नोव्हेंबर 2026
No comments:
Post a Comment