आजची वात्रटिका
-------------------------
पाठिंबा
आतला किंवा बाहेरचा,
पाठिंबा हा पाठिंबा असतो.
जसा ऐनवेळी कुत्र्यालाही,
नेमका खांबा दिसतो.
सरकारच्या स्थैर्यासाठी,
आमचेही देवाला साकडे असते!
पाठिंबा म्हणजे कुत्र्याचे शेपूट,
वाकडे ते वाकडे असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-73
दैनिक पुण्यनगरी
21 मे 2004
No comments:
Post a Comment