आजची वात्रटिका
--------------------
दुष्काळ आणि सुकाळ
आपले पोकळ शाब्दिक बाण,
कवी लोक ढगांमध्ये सोडू लागले.
दुष्काळाची संधी दिसताच,
दुष्काळाच्या कविता पाडू लागले.
त्यांच्या कवितांची पाडापाडी तर,
बारा महिने तेरा त्रिकाळ आहे.
पाऊस पाण्याचा दुष्काळ तरी,
कवी लोकांचा मात्र सुकाळ आहे.
शब्दबंबाळ कविता म्हणजे,
अति तिथे माती आहे !
दुष्काळ सोसतो; कविता आवरा,
अशीच आजची स्थिती आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 94452
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
8 नोव्हेंबर 2026
--------------------------
https://suryakantdolase.blogspot.com
No comments:
Post a Comment