Monday, November 9, 2026

वाजवा रे वाजवा... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------

वाजवा रे वाजवा !

प्रकाशाच्या उत्सवात,
प्रत्येकजण  न्हाऊन गेला.
दिवाळीच्या धुमधडाक्यात, 
जणू दुष्काळ वाहून गेला.

दुष्काळाच्या सगळ्याच, 
कल्पना फसल्या असतील.
बहुतेक दुष्काळाच्या, 
कानठळ्या बसल्या असतील.

दिवाळीवर दुष्काळाची नाही, 
दुष्काळावर दिवाळीची छाया आहे!
ॲटम बॉम्ब फुटत म्हणाला,
दुष्काळ म्हणजे माया आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9453
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता 
9 नोव्हेंबर 2026
---------------------------
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

दुकानदारी.... प्रसिद्ध वात्रटिकावर व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------- दुकानदारी ज्यांची ज्यांची दारुची दुकानं त्यांचीच शिक्षणाची दुकानं आहेत. त्यांच्यासाठी प...